Maval : मावळात अनुभवी आणि नवख्या उमेदवारामध्ये होणार लढत

मावळातून श्रीरंग बारणे-पार्थ पवार यांच्यात लढत

पवार घराण्याच्या तिस-या पिढीची मावळातून राजकारणात एंट्री

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळमध्ये युतीचे बारणे आणि आघाडीचे पवार यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ हे पुत्र आहेत. मावळात थेट पवार घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार असून याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ सलग दुस-या वर्षी शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिस-यावेळी भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित असून एक-दोन दिवसात ते प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. तर, मावळातून सलग दोनवेळा पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीने यावेळी थेट पवार घराण्यातील उमेदवार दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यांची पक्षाने आजच उमेदवारी जाहीर केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदार संघात पाचवर्षात विकाम केली आहेत. त्यांनी संघात पक्षाची चांगली बांधणी केली आहे. त्यांचा पाठिराखा वर्ग मोठा आहे. बारणे यांची मागील पाच वर्षातील संसदेतील कामगिरी देखील उल्लेखणीय आहे. त्यांना सलग पाचवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बारणे अनुभवी राजकारणी आहेत. पिंपरी महापालिकेत त्यांनी 25 वर्ष नगरसेवक म्हणूक काम केले आहे.

पार्थ पवार हे नवखे आहेत. परंतु, त्यांच्या पाठिशी पवार नाव आहे. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. पार्थ यांनी गेल्या सहा महिन्यापासून मतदार संघ पिंजून काढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. त्यामुळे पार्थ यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अनुभवी आणि नवख्या उमेदवारामध्ये लढत होणार आहे. पवार घराण्यातील उमेदवार असल्याने याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

मावळ लोकसभेतील आमदार

गौतम चाबुकस्वार, पिंपरी (शिवसेना)
लक्ष्मण जगताप, चिंचवड (भाजप)
बाळा भेगडे, मावळ (भाजप)
मनोहर भोईर, उरण (शिवसेना)
प्रशांत ठाकूर, पनवेल (भाजप)
सुरेश लाड, कर्जत खालापूर (राष्ट्रवादी

2009 च्या निवडणुकीत मिळालेली मत

एकूण मतदार – 16 लाख 43 हजार 408

गजानन बाबर – शिवसेना – 3 लाख 64 हजार 857 (विजयी)
आझम पानसरे – राष्ट्रवादी काँग्रेस – 2 लाख 84 हजार 238

2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते

एकूण मतदार – 19 लाख 22 हजार 343

श्रीरंग बारणे (शिवसेना) – 5 लाख 12 हजार 226 (विजयी)
लक्ष्मण जगताप (शेकाप-मनसे) – 3 लाख 54 हजार 829
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1 लाख 82 हजार 293

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.