Maval : मावळात चार जि. प. शाळेवरील पत्रे उडाले; अनेक ठिकाणी झाडपडी, विद्युत खांबही पडले

In Maval, four Letters flew from the Zilla Parishad School; In many places, trees and electricity poles also fell

एमपीसी न्यूज – निसर्ग वादळाच्या तडाख्याने मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत खांब पडल्याने तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार शाळांवरील आणि 20 घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत. त्यातच वादळाने देखील हैदोस घातला आहे. मावळ तालुक्यात देखील याचा परिणाम दिसून आला आहे. अनेक ठिकाणी घरावरील, शाळेवरील पत्रे उडून गेले. विद्युत खांब पडले, झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवित हानी झालेली नाही.

# पत्रे उडालेल्या शाळा –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोणशेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाहनगाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजगाव ब्राह्मणवाडी (शाळेतील किचन शेडवरील पत्रे उडाले आहेत)

# घरावरील पत्रे उडालेली गावे –
भोयरे, तिकोना, गोवित्री, शिवणे, पिंपळखुटे, पिंपळोली, करंजगाव या गावातील 20 घरावरील पत्रे उडाले आहेत.

# उर्से टोल नाका, लोणावळा पोलीस स्टेशन येथे देखील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

# झाडे पडलेले रस्ते –
तळेगाव – कातवी रस्ता
सोमटणे – शिरगाव रस्ता
पवना नगर – कामशेत रस्ता

# विद्युत खांब पडलेली ठिकाणे –
पाले फाटा, टाकावे, करंजगाव, मोरमारवाडी, मळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.