Maval : वडगाव मावळ न्यायालयात आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये दोन कोटी रुपयांची वसुली

एमपीसी न्यूज – विधी सेवा समीती (ता. मावळ, जि. पुणे) यांच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयात आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये विविध खटल्यांमध्ये पक्षकारांच्या संमतीने तडजोड करून सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली.

‘लोक अदालत’ हे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले किंवा खटला करण्याच्या पातळीवर असलेले विवाद सन्माननीय तोडगा काढण्यासाठी किंवा त्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित केली जाते. वडगाव मावळ न्यायालयात दि. 14/12/2019 रोजी आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये बँक कर्ज, फौजदारी खटले, विद्युत बिल, वैवाहिक वाद, धनदेशाच्या पैशांचे खटले, दिवाणी दावे, महसुली केसेस तसेच थकित पाणीपट्टी, घरपट्टी अशा विविध एकुण 676 केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या व त्यामध्ये एकुण रक्कम 2 कोटी 17 लाख 42 हजार 358 रूपयांची वसूली झाली.

या लोक अदालतमध्ये वडगाव मावळ न्यायालयातील न्यायाधीश पी. जी. देशमुख, एस. ए. मुळीक, बी. व्ही. बुरांडे, आर. के. गायकवाड, पी. एम. सुर्यवंशी व वडगाव मावळ बार असोसिएशनचे सभासद ॲड. चेतन जाधव, ॲड. सुधा शिंदे, ॲड. शैलेश पडवळ, ॲड. प्रशांत दाभाडे, ॲड. रुबीया तांबोळी, ॲड. अण्णासाहेब राऊत, ॲड. कविता तोडकर, ॲड. कविता लालगुडे, ॲड. कुणाल गाडे, ॲड. वैशाली साबळे यांनी पॅनल न्यायाधीशचे काम पाहून केसेसमध्ये तडजोडी घडवून आणल्या.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी लोक अदालत हि पक्षकारांना आपआपसातील वाद मिटवून न्याय मिळवण्याची सुवर्णसंधी असते ती त्यांनी दवडू नये, असे मत न्यायाधीश पी.जी. देशमुख यांनी व्यक्त केले.

पुढील लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त खटले मिटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यन्यायाधिश एस. ए. मुळीक यांनी मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील खटले मिटविण्यासाठी पंचायत समितिचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी विशेष प्रयत्न केले.

तसेच लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. तुकाराम काटे, ॲड. गणेश शिराळकर, ॲड. वाय. पी. गोरे, ॲड. पी. बी. काळे, सचिव ॲड. जयश्री शितोळे, ॲड. महेंद्र खांदवे, ॲड. अमोल दाभाडे, ॲड. सुभाष तुपे, विश्वनाथ जाधव,ॲड. देविदास मराठे व सर्व वकीलांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.