Maval: अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांना आर्थिक मदतीचा ओघ

एमपीसी न्यूज – शेतक-यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हातात घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार प्रशांत उर्फ बाबाराजे गणपत देशमुख यांना मावळसह राज्यभरातील नागरिकांकडून आर्थिक मदत केली जात आहे. सर्वसामान्यांकडून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे. 
मावळ लोकसभा मतदारसंघातून बाबाराजे देशमुख अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर धनदांडगे उमेदवार उभे आहे. त्यांना तोंड देण्यासाठी बाबाराजे यांना राज्यभरातून आर्थिक मदत केली जात आहे.  एक सर्वसामान्य  कुटुंबातील शेतकरी पुत्र व रस्त्यावरील संघर्षात सर्वसामान्यांची व्यथा मांडणारा कार्यकर्ता मावळच्या रिंगणात उतरला आहे. सर्वसामान्यांसाठी संघर्षाची लढाई लढायला सज्ज झाला आहे. परंतु, आर्थिक बाजू कमी पडत आहे. मावळसह राज्याच्या विविध भागातून नागरिक बाबाराजे यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

  • मावळातील व महाराष्ट्रातील सर्वसामान्यांनी मोबाईल अॅप, पेटीएम अॅप, गूगल अॅपच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत. आतापर्यंत कोणत्याच नेत्याने अथवा राजकरण्याने सर्व सामान्य जनतेची भूमिका घेतली नाही. गरीब जनतेचे  प्रश्न कोणतेच मार्गी लावले नाहीत. त्यासाठी या लढाईत आम्ही तन -मन-धनाने अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे, देणगीदार सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.