Maval : इंदोरी दहा दिवसासाठी संपूर्ण बंद

Indori completely closed for ten days इंदोरी गावात १० कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

एमपीसी न्यूज  –  इंदोरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून ९ जुलै ते १८जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.

इंदोरी गावात १० कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला.तसेच जवळच्या माळवाडी, वराळे,नाणोली, सुदुंबरे या गावांमध्येही कोरोना रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे इंदोरी व परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

काही लोकांच्या बेफिकीरीमुळे लाॅकडाऊन मधील नियमांचे पालन होत नाही.स्वत:सह इतरांचे ही जीव धोक्यात घालीत आहेत. कोरोनाला अटकाव करण्याचे हेतूने ग्रापंचायत, पोलीस स्टेशन,आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांनी संगनमताने बंदचा निर्णय घेतला आहे.

बंद कालावधीत मेडिकल व दवाखाने सकाळी ९ ते सायंकाळी ६, तर बँकव्यवहार व बी-बियाणे दुकाने सकाळी​ ​९ ते ​दुपारी ​१ आणि दूध डेअरी व दूध संकलन सकाळी८ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चालू राहातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.