Maval: मळवलीच्या उपसरपंचपदी जमुना पटेकर बिनविरोध

Maval: Jamuna Patekar elected unopposed as Deputy Sarpanch of Malavali. जमुना पटेकर ह्या मावळ तालुका संत रोहिदास सेवा संघ महिला कमिटी अध्यक्षा असून याआधी सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे भूषवली आहे. 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील मळवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जमुना गणेश पटेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

याआधीचे उपसरपंच तुकाराम ठोसर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी पटेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

सरपंच सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पठाण यांनी काम पाहिले. माजी पंचायत समिती सदस्य मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या विशेष प्रयत्नातून ही उपसरपंचपदाची  निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे.

 ग्रामपंचायत सदस्या  रिना साबळे, विद्या तिकोणे, अस्लम शेख, प्रियंका जीर, सोनाली ढाकोळ, कोयना शेडगे तसेच पाटण गावच्या पोलीस पाटील रूपाली धनेश पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पटेकर ह्या मावळ तालुका संत रोहिदास सेवा संघ महिला कमिटी अध्यक्षा असून याआधी सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे भूषवली आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.