Maval: राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ यांच्या सोशल मीडियाची जबाबदारी जय सांभाळणार

पार्थला वि'जय' मिळवून देण्यासाठी सख्खा भाऊ मैदानात

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यापासून पवार कुटुंबीयाचा वावर मोठ्या प्रमामात दिसून येत आहे. आजोबा, वडील, आई, आत्या आणि चुलत भाऊ हे मतदारांशी थेट संवाद साधताहेत. पण सोशल मीडियात गुंतलेल्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी आता सख्खे भाऊ ‘जय’ देखील प्रचाराची खिंड लढवणार आहेत. पार्थच्या सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी जय सांभाळणार आहे.

मोठे बंधू पार्थ यांना वि’जय’ मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला. वडील अजित पवार यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरुच आहे. आई सुनेत्रा पवार, आत्या निता पाटील याही कोपरा सभा, बैठका घेत आहेत. चुलत बंधू रोहित पवार देखील प्रचारात सक्रीय असून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. जाहीर सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत हे पोहचतील.

पण तरुणवर्ग जो सभा आणि बैठकांपासून कोसो दूर राहून सोशल मीडियात गुंतलेला आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आता ‘जय अजित पवार’ खिंड लढवणार आहे. सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा तो सांभाळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.