Maval: कामशेत, माळवाडी, सोमाटणे ही गावे कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर

Maval: Kamshet, Malwadi and Somatane declared as Containment Zones यापूर्वी फक्त रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेन्मेट झोन करण्यात येत होता. परंतु, नवीन आदेशानुसार ग्रामीण भागात ज्या गावात रूग्ण आढळतील ते संपूर्ण गाव कंटेन्मेट झोन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात सोमवारी (दि.6) रुग्ण आढळून आल्याने कामशेत, माळवाडी, सोमाटणे ही तिनही गावे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

सोमवारी कामशेत येथील 45 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली होती. तर माळवाडी येथील एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा व मुलगी अशा चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

याशिवाय सोमाटणे येथील याआधी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, यापूर्वी फक्त रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेन्मेट झोन करण्यात येत होता. परंतु, नवीन आदेशानुसार ग्रामीण भागात ज्या गावात रूग्ण आढळतील ते संपूर्ण गाव कंटेन्मेट झोन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी कामशेत, माळवाडी व सोमाटणे ही गावे कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केली आहेत. माळवाडी लगत इंदोरी, मनोहरनगर, विद्याविहार कॉलनी, सोमाटणे लगत असणारे शिरगांव व कामशेत लगत असणारे नायगाव, येवलेवाडी व खामशेत ही गावे बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.