Maval : दुरुस्तीच्या कामानिमित्त कान्हे रेल्वे फाटक शनिवारपासून तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागाच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त कान्हे येथील रेल्वे फाटक शनिवार (दि. 21) पासून तीन दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कामशेत ते तळेगाव या मार्गावर रेल्वे विभागाकडून विविध दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे कान्हे येथील रेल्वे फाटक (फाटक क्रमांक 45) शनिवारी (दि. 21) सकाळी आठ ते सोमवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

कान्हे रेल्वे फाटक येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जांभूळ रेल्वे फाटक (फाटक क्रमांक 47) येथून प्रवास करता येणार आहे. नागरिकांनी रेल्वे विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.