Maval : कांब्रे नामा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तृप्ती (करुणा) गायकवाड यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नाणे मावळातील कांब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ तृप्ती (करुणा) कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधीचे सरपंच भाऊसाहेब दाभणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली.

गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. खोमणे आणि यु. एस. दुधाने यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. सह्ययक म्हणून ग्रामसेवक जे. एस. तांबे यांनी काम पाहिले. कांब्रे गावातील गायकवाड परिवारातील पहिल्या महिला सरपंच होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत.

त्यावेळी माजी सरपंच साईनाथ गायकवाड, नथु गायकवाड, बाळासाहेब प-हाड, सावित्रा दाभणे, नंदा गायकवाड, लक्ष्मी प-हाड, संगीता गायकवाड आदी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विष्णू गायखे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन भेगडे, माजी सरपंच प्रकाश आगळमे, शामराव गायकवाड, अंकुश गायकवाड, गोरख बांगर, कैलास खांडभोर, विजय गायकवाड, सोमनाथ गायकवाड, संजय माझिरे, पोलीस पाटील भारती गायकवाड, लहु गायकवाड, तानाजी दाभणे, माऊली दाभणे, रमेश गायकवाड, नितीन गायकवाड आणि ग्रामस्थ आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी काळात रस्ता काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार, शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छता व प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.