Maval : खांडशी ग्रामपंचायत मधील नेसावे गावाच्या हद्दीत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या माध्यमातुन खांडशी ग्रामपंचायत मधील नेसावे या गावाच्या हद्दीत ६२:४३ लाख रुपये खर्च करुन कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याचा जलपूजनाचा कार्यक्रम बुधवारी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई सुदामराव कदम व मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांचे हस्ते करण्यात आला.

या बंधाऱ्यात एकुण पाणीसाठा 150.57 स. घ. असून गावातील शेतकऱ्यांना त्या पाण्यावर जमिनी बागायती करता येणार आहेत. या बंधाऱ्यामुळे मावळ तालुक्यातील पाणी टंचाईचे प्रमाण कमी होणार आहे.

यावेळी पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी गौरव बोरकर, शाखा अभियंता व्ही.एम.रोडे, शाखा अभियंता आर. एम. तांदळे, सरपंच वैदेही रणदिवे, उपसरपंच रामदास राणे, संघटन मंत्री नारायण ठाकर, सरचिटणीस सुदाम कदम, चेअरमन विठ्ठल शिरसट, माजी उपसरपंच बाळासाहेब शिरसट, माजी सरपंच कैलास खांडभोर, चंद्रशेखर परचंड पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस गाव अध्यक्ष देवराम शिरसट, विजय शिरसट, मुरलीधर कुटे, ग्रामसेवक जाधव मँडम व ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन विठ्ठल शिरसट यांनी केले व आभार शिवाजी बैकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.