Maval : मावळमधील सात शाळांच्या मूलभूत सुविधा विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि पाॅसको कंपनीच्या (Maval) सीएसआर प्रकल्पाअंतर्गत मावळातील सात शाळेमधील मूलभूत सुविधा विकास कार्यक्रमाला आदर्श विद्यालयातील पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत शाळांसाठी संगणक, प्रिंटर, जल शुद्धीकरण यंत्र, सॅनिटरी पॅड वहेंडिंग यंत्र, फळे, बाक, बायोमेट्रिक यंत्रणा, साउंड सिस्टीम अशा विविध सुविधांचा समावेश आहे.

शाळांची नावे – 

1)  स्वामी समर्थ इंग्लिश मध्यम स्कूल
२) गोल्डन ग्लेड माध्यमिक विद्यालय
3) सरस्वती विद्या मंदिर
4) महादेवी माध्यमिक विद्यालय
५) वरसुबाई माध्यमिक विद्यालय
6) आदर्श विद्या मंदिर

Balewadi News : मेट्रो काम सुरु असताना गॅस वाहिनी फुटल्याने आग

हा कार्यक्रम अध्यक्ष अनिश होले, सचिव कमलेश कार्ले, यादवेंद्र खळदे, महेश महाजन, भालचंद्र लेले, राजन आमरे, रिषिकेश कुलकर्णी, प्रसाद मुंगी, डाॅ. पुणे, विश्वनाथ मराठे, बाळासाहेब चव्हाण, प्रभाकर निकम, जयंत देशपांडे, गजानन गोरे, राजू गोडबोले, श्रीशैल मेंथे, निलेश वाकचौरे, जनार्दन धम, धनंजय मथुरे ,निलेश भोसले मंगेश गारोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष उद्धव चितळे यांनी (Maval) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.