Maval: मुंबईतील डबेवाल्यांसाठी ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’चा उपक्रम, गृहोपयोगी किटचे वाटप

Maval: Lions Club international initiative for mumbai dabbawala, distribution of 1000 household kits मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात मिळून 1000 किट्सचे वाटप होणार असून त्यापैकी 250 किटचे वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांची भूक भागविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डबेवाले यांना लायन्स प्रांत यांनी सहकार्याचा हात दिला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील कल्हाट, कशाळ आदी ठिकाणी डबेवाल्यांच्या कुटूंबीयांना सुमारे 15 दिवस पुरेल असे उत्कृष्ठ दर्जाचे किराणा साहित्याचे 250 किटचे वाटप करण्यात आले.

गव्हाचे पीठ, खाद्यतेल, तूरडाळ, कडधान्ये, साखर, मीठ, बिस्किटे आदी वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.

मुंबई येथील लायन्स प्रांत 3231 ए 3 चे प्रांतपाल शशिकांत मोढ, उपप्रांतपाल डॉ. ख्वाजा मुदस्सीर, हेमंतराज सेठिया, मा. प्रांतपाल दिपक चौधरी, प्रांत सेवाकार्य प्रमुख प्रिती सोधा, प्रकल्प प्रमुख मीना रामास्वामी यांच्या माध्यमातून या किट्सचे वाटप करण्यात आले.

लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन एमजेएफ सुनीत कदम, मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे, प्रवक्ते विनोद शेटे, लायन्स प्रांत 3234 डी 2 चे कॅबिनेट प्रतिनिधी भूषण मुथा, आदिनाथ ढमाले, लायन्स क्लब ऑफ वडगांवचे संचालक संजय भंडारी, योगेश भंडारी यांच्या हस्ते या किट्सचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी रामदास करवंदे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच यापूर्वी देखील लायन्स संस्थेच्या वतीने सायकल वाटप, गणवेश वाटप असे उपक्रम राबविण्यात आले होते, अशी माहिती दिली.

निसर्ग चक्रीवादळाने कल्हाट गावातील प्रभाकर कोंडिबा खापे यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांना देखील घराच्या दुरुस्तीसाठी लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर आपत्कालीन अडचणींवर यापुढेही सेवाकार्य सुरू राहील, असे झोन चेअरपर्सन एमजेएफ सुनीत कदम यांनी सांगितले

भूषण मुथा यांनी मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात मिळून 1000 किट्सचे वाटप होणार असून त्यापैकी 250 किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली. सामाजिक अंतर, मास्क वापर आदी नियमांचे पालन करून हा उपक्रम पार पडला.

या वेळी संतोष पवार, रामदास यादव, काळू पवार, भागाजी यादव, देवराम कल्हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.