Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली. विनायक उर्फ पैलवान वाघू घारे (वय 37, रा. येळघोल, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांचे एलसीबी पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यामध्ये पोलिसांनी विनायक याला अटक केली. विनायक हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे. पुढील कारवाईसाठी त्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी विनायक याच्यावर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीचा एक, बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्यात चोरीचा एक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस नाईक गणेश महाडिक यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.