Maval Loksabha Election : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांची 18 कोटींची संपत्ती

वाघेरे कुटुंबियांकडे एकूण 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.23 एप्रिल) रोजी दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून(Maval Loksabha Election) त्यांची संपत्ती समोर आली आहे. वाघेरे यांच्याकडे एकूण 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर दोन कोटी 98 लाख 32 हजारांचे कर्ज आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे 4 कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपयांची  तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 6 कोटी 85 लाख रुपयांची  तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे 5 कोटी 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.वाघेरे कुटुंबियांकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

 

तसेच,संजोग वाघेरे यांच्याकडे 351 ग्रॅम वजनाचे 21 लाख 76 हजार 571 रुपयांचे दागिने आहेत.त्यांच्याकडे एक लाख 54 हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. दरम्यान,वाघेरे यांच्यावर 64 लाख 48 हजार 271 रुपयांचे तर  त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्यावर 2 कोटी 33 लाख 84 हजार रुपयांचे कर्ज आहे.

Maval LokSabha Elections 2024 : शक्तिप्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे 50 हजार 490 रुपयांचे विदेशी बनावटीचे पिस्तूल देखील आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड आणि पिंपरी येथे अनुक्रमे एक आणि चार अशा पाच निवासी मालमत्ता आहेत. वाघेरे पती-पत्नींनी आपले उत्पन्नाचे साधन व्यवसाय (Maval Loksabha Election) दाखविला आहे.संजोग वाघेरे यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. मात्र त्यांनी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघेरे यांना एक कोटी 24 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. तर, पत्नीला 97 लाख रुपये उसने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.