Maval: घराणेशाहीच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविणार -बाबाराजे देशमुख

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला मावळवासियांवर घरातील उमेदवार लादला आहे. वर्षानुवर्ष यांनीच सत्ता उपभोगली असताना पुन्हा घरातील उमेदवार दिला आहे. पक्षाला मावळातील उमेदवार मिळाला नाही का? असा खडा सवाल करत घराणेशाहीच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार तळेगावातील युवा कार्यकर्ते, मराठा साम्राज्य संघाचे संस्थापक-अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केला आहे.

तळेगावातील रहिवाशी असलेले बाबाराजे देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गड-किल्यांच्या संवर्धनाचे ते काम करतात. मावळचा दूरगामी विचार आणि शाश्वत विकास करणे, स्थानिक युवकांना न्याय मिळवून देणे, त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देणे आणि शेतक-यांच्या समस्या, गड-किल्ल्यांचे पुनर्बांधणी हे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले.

  • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप या राजकीय पक्षांच्या राजवटीत मावळातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे आपण सगळ्या पक्षांच्या विरोधात असून अपक्ष निवडणूक लढविणार आहोत. राष्ट्रवादीने घरातील लहान मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यांना पक्षातील मतदार संघातील एकही कार्यकर्ता निवडणूक लढविण्यासाठी सक्षम वाटला नाही का?, आमचे काही काम असल्यास आम्ही बारामतीला जायचे का?, आम्हाला मावळात घराणेशाही नको आहे. त्यामुळे आपण घराणेशाहीच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.