Maval LokSabha Election : मावळ लोकसभेसाठी 12 जणांनी नेले 21 अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 19 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 12 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 21 नामनिर्देशन (Maval LokSabha Election) पत्र नेले आहेत.

18 एप्रिल 2024 रोजी सुमारे 27 व्यक्तींनी एकुण 49 नामनिर्देशन पत्रे नेली होती तर आज दि.(19 एप्रिल)  रोजी सुमारे 12 व्यक्तींनी एकुण 21 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. त्यामुळे आजपर्यंत 39 व्यक्तींनी एकुण 70 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. यशवंत विठ्ठल पवार (कर्जत, क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल (Maval LokSabha Election) केले आहे.

Loksabha election : औंध जिल्हा रुग्णालय, सांगवीतील स्पर्धा परीक्षा केंद्रात मतदार जनजागृती

डॉ.अक्षय गंगाराम माने (काळेवाडी, वंचित बहुजन आघाडी), पंकज प्रभाकर ओझरकर (चिखली, आखिल भारतीय परिवार पार्टी), फुलचंद मंगल किटके (पनवेल, बहुजन समाज पार्टी), इंद्रजित डी.गोंड (खोपोली रायगड, अपक्ष), ज्योत ईश्वर  भोसले (पनवेल , बळीराजा पक्ष), साईनाथ जगन्नाथ डोईफोडे (पनवेल, अपक्ष), विशाल तुळशिराम मिठे (थेरगाव, अपक्ष), राजेंद्र मारुती काटे (जुनी सांगवी , अपक्ष), सचिन महिपती सोनवणे (पिंपरी, वंचित बहुजन आघाडी), गोपाळ यशंवतराव तंतरपाळे (देहुरोड, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी), मारुती अपराई कांबळे (पिंपळे निलख, अपक्ष), शिवाजी किसन जाधव (थेरगाव,अपक्ष) यांनी आज अर्ज नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.