Maval LokSabha Election 2024 : कोणत्या उमेदवाराने किती केला खर्च?

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी 59 लाख रुपये (Maval LokSabha Election 2024) तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेकाप-मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी 57 लाखांचा खर्च केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 4 जून 2024 रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 95  लाख रूपये इतकी आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

उमेदवारांच्या दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जात होत्या.  व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला गेला. या खर्चाची तीनवेळा तपासणी करण्यात आली.

Today’s Horoscope 16 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

त्यामध्ये उमेदवारांनी केलेला खर्च समोर आला आहे.  महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी 59 लाख 166 रुपयांचा खर्च केला आहे. त्याखालोखाल महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी 57 लाख 12 हजार 542 रुपयांचा खर्च केला. दरम्यान, दोघांच्याही निवडणूक खर्चात तफावत आढळली आहे.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दोघांनाही नोटीस बजावली. तर,  अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव, यशवंत पवार आणि संतोष उबाळे या तीन उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीसाठी उपलब्ध करुन (Maval LokSabha Election 2024) दिले नाहीत. त्यामुळे त्यांनाही नोटीस दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.