Maval : लोकसभा निवडणूक; प्रचारात शुक्रवारपासून येणार रंगत

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. शुक्रवार(दि.12) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि शुक्रवारपासून प्रचाराला रंगत येईल. शहरात मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होईल.

मावळ लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. मंगळवारी (दि.9) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या प्राप्त अर्जांची आज छाननी होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.12) अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होऊन प्रचारात रंगत येणार आहे.

उमेदवारांना अधिकृत प्रचारासाठी केवळ 16 दिवसाचा अवधी मिळणार आहे. लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचार सुरु केला आहे. दररोज मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन बैठका, सभा, प्रचारसभा घेण्याचा सपाटा सुरु आहे. 12 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर मोठ्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरु होईल. ख-या अर्थाने प्रचारात रंगत येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.