Maval LokSabha Elections 2024 : मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत (Maval LokSabha Elections 2024) जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी जागेत राजकीय मजकूर असलेला विनापरवाना 120।बाय 60 आकाराचा जाहिरात फलक आढळून आला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या व जमीन मालकाविरोधात विद्रुपीकरण विरोधी कायदा 1995 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : चिकाउचो कंपनी व रोटरीने केला शिळींब प्राथमिक शाळेचा कायापालट

भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश जगताप, किशोर शेवंती, सुनील शिंदे यांच्यासह गणेश गावडे, प्रमोद काळे यांनी ही कारवाई केली.

सर्व राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. परवानगीशिवाय प्रकारचे जाहिरात फलकावर मजकूर प्रसिद्ध करू नये. विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याचे आढळल्यास संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आला (Maval LokSabha Elections 2024) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.