Maval LokSabha Election : मावळमधून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून यशवंत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची (Maval LokSabha Election) निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून दि.18 एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय 7 वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी या ठिकाणी ही नामनिर्देशन पत्रे स्वीकृत केली जातील. दि. 25 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.26 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छानणी केली जाईल तर दि.29 एप्रिल हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि.4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

Maval LokSabha Election : मावळ लोकसभेसाठी 12 जणांनी नेले 21 अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Maval LokSabha Election) अनुषंगाने गुरुवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले. तर, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 12 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून यशवंत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.