Maval LokSabha Elections 2024 : दिलीप वेंगसरकर अकॅडमी, बिर्ला हॉस्पिटलमध्ये  मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Maval LokSabha Elections 2024)अंतर्गत 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दिलीप वेंगसरकर अकॅडमी, बिर्ला हॉस्पिटलमध्ये  मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला आणि सहायक निवडणूक निर्णय (Maval LokSabha Elections 2024)अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड  येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला.

 

हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी आणि तेथे जमलेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच 205 चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

 

तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी आणि तेथे जमलेल्या रुग्णांचे नातेवाईक मतदारांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला व त्यांच्याकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.

 

Wakad: डोक्यावरून टेम्पो चे चाक गेल्याने तरुणीचा मृत्यू

थेरगावातील दिलीप वेंगसरकर अकॅडमी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला. विद्यार्थी, पालक व 205 चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी  राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.यामध्ये पालकांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला व पालकांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.