Maval : मॅजिक बस शुभारंभ प्रकल्पाचा ‘लॉकडाऊन’मध्ये ‘ऑनलाईन उपक्रम; विद्यार्थी, पालकांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील निगडे येथील शाळकरी विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरच आयोजित समर कॅम्प केला. निगडे गावातील शाळेमध्ये शिकणा-या तसेच गेली 14 दिवस घरामध्येच अडकलेल्या लहानग्यांना विरंगुळा म्हणून ऑनलाइन उन्हाळी शिबिरासाठी आवाहन करण्यात आले.

उपक्रमाबाबत अनेक पालकांशी फोनवर चर्चा करुन आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रुपचा योग्य वापर करत शुभारंभाचे सतीश थरकुडे यांनी “कोरोना जनजागृती” या विषयी चित्र काढण्याचे आवाहन केले. याला गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ग्रुपवरच चित्र पाठवल्याने अनेकांनी मुलांचे कौतुक केले तर शुभारंभ प्रकल्पांतर्गत मुलांना लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशस्तीपत्र वाटप केले जाणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास मोढवे यांनी सांगितले.

शाळेचे आदर्श शिक्षक आदिनाथ शिंदे सरांनी प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सरपंच सविता भांगरे यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत आभार मानले. तर उपसरपंच रामदास चव्हाण यांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या व कोरोनाबाबत जनजागृती करणार-या प्रकल्पाचे कौतुक केले. अनेक पालक, तरुण वर्गाने मुलांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.