Maval: घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी- गुलाब म्हाळसकर

Maval: Make space available for Gharkul says Gulab Mhalaskar कोणत्याही प्रकारची शासकीय जागा उपलब्ध नसल्यास, अशा ठिकाणची जागा खरेदी करण्याचे अथवा बक्षिसपत्राद्वारे देण्याची नावे कळवावीत, असे ही म्हाळसकर यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील वडगाव- खडकाळा गटातील सहा गावातील ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र’ ‘ब’ मध्ये 20 लाभार्थी पात्र असून जागे अभावी त्यांची घरकुलांची कामे होऊ शकली नाही, त्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाब म्हाळसकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण प्रपत्र ‘ब’ पात्र असलेल्या तालुक्यातील वडगाव- खडकाळा गटातील खडकाळा येथील 3, कान्हे व कुसगाव येथील प्रत्येकी 6 व चिखलसे येथील 5 अशा एकूण 20 लाभार्थ्यांना जागा नसल्याने घरकुलांचा लाभ देता आला नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थी पात्र असूनही या योजनेपासून ते दूर राहिले आहेत.

संबंधित लाभार्थींना लाभ मिळून देण्यासाठी व जागा उपलब्धतेसाठी माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाब म्हाळसकर यांनी यासंदर्भात संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांची कान्हे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यालयात बैठक घेतली.

या बैठकीत सरपंच, ग्रामसेवक यांनी लाभार्थ्यांना खासगी जागा सोडून इतर गायरान, गावठाण, वनक्षेत्र यासह सर्व शासकीय जागा उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. कोणत्याही प्रकारची शासकीय जागा उपलब्ध नसल्यास, अशा ठिकाणची जागा खरेदी करण्याचे अथवा बक्षिसपत्राद्वारे देण्याची नावे कळवावीत, असे ही म्हाळसकर यांनी सांगितले.

या बैठकीस कान्हे ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच विजय सातकर, ग्रामसेवक आर टी कारंडे, कुसगाव खुर्द च्या सरपंच सारिका लालगुडे, ग्रामसेवक विद्या लोखंडे, चिखलसेचे ग्रामसेवक अमोल कोळी आदी उपस्थित होते. सदर बैठकीचे संयोजन पंचायत समिती विस्तार अधिकारी (सा) शुभांगी भूमकर यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.