Maval: गुटखा विक्री करणाऱ्या एकाला अटक

Maval: Man arrested for selling gutka त्याच्या घराची झडती घेतली असता घरात पाच हजार 638 रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा मिळून आला.

एमपीसी न्यूज– शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा करून तसेच त्याची विक्री करणाऱ्या एकाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून पाच हजार 638 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद शाफिक मदारबक्ष खान (वय 38, रा. सावंतवाडी, इंदोरी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत (वय ३४) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि तत्सम पदार्थ विक्री त्याचा साठवणूक करण्यासाठी प्रतिबंध आहेत. असे असतानाही आरोपी शेख याने त्याच्या सावंतवाडी येथील घरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा करून ठेवला होता.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपी शेख याला ताब्यात घेतले.

त्याच्या घराची झडती घेतली असता घरात पाच हजार 638 रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा मिळून आला. सर्व साठा जप्त करत शेख याला अटक करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.