Maval :भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुने भांडण मिटविण्यासाठी तरुणाला बोलावून घेत चार जणांनी मिळून तरुणाला (Maval) बेदम मारहाण केली. तसेच तरुणाकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी कासारसाई येथे घडली.

 

शिवराज मारुती शेडगे (वय 21), अजय उर्फ सोन्या चंद्रकांत साठे (वय 23), शुभम शंकर क्षीरसागर (वय 19), रितेश कडूबा राठोड (वय 19, सर्व रा. कासारसाई, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आर्यन अशोक खैरे (वय 23, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीला जुनी भांडणे मिटविण्यासाठी कासारसाई येथील स्मशानभूमी समोर असलेल्या शंकराच्या मंदिरासमोर बोलावून घेतले. तिथे त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून आरोपींनी आर्यन यांना मारहाण केली. आरोपींच्या भीतीने आर्यन त्यांच्या कारमध्ये बसून निघून जात असताना आरोपींनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. त्यांना अडवून कारमधून ओढून पुन्हा मारहाण केली. आरोपींनी आर्यन यांच्या खिशातून 1200 रुपये जबरदस्तीने काढून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

Maval :भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणाला बेदम मारहाण

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.