Maval : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विविध संस्थांचा जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज- शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच आकुर्डीतील दोन मौलवींनी देखील बारणे यांना पाठिंबा दिला आहे.

कुंभार समाजोन्नती मंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे. भाजपच्या राजवटीत देशाने अतुलनीय प्रगती केली असून गोरगरिब व पददलित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्याचे महत्वाचे कार्य या सरकारने केले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या वतीने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने जीएसटी सारखा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, ऑनलाईन ई सुविधा, परवानगी, परवानग्यामध्ये आणलेली सुलभता व भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन केले आहे. सरकारच्या दूरदृष्टी धोरणामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापा-याला भविष्यात चांगले दिवस येणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने पाठिंबा पत्रात म्हटले आहे.

या संघटनांनी दिला पाठिंबा

समस्त हिंदू आघाडी, दलित पॅन्थर, आयटी एम्प्लॉयी प्रतिनिधी, राष्ट्रीय भोईसमाज क्रांतीदल, महाराष्ट्र राज्य धोबी (परीट)समाज महासंघ, मुळशी शेतकरी संघटना, भारतीय प्रवासी संघटना त्याचबरोबर आकुर्डीतील मौलाना आझीज, मौलाना रजाहूल मुस्तफा यांनीही महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.