Maval: पर्यटन विकास, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरणातून मावळचा करणार विकास – अ‍ॅड. खंडुजी तिकोणे

एमपीसी न्यूज – पर्यटन विकास, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण अशा विविध माध्यमांतून मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,असे मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. खंडुजी तिकोणे यांनी सांगितले.

मावळ विधानसभा मतदारसंघातून ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढवीत असलेले उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार अ‍ॅड. खंडुजी तिकोणे यांनी त्यांचा निवडणूक वचननामा नुकताच प्रकाशित केला. या वचननाम्याच्या माध्यमातून तिकोणे यांनी त्यांचे मावळच्या विकासाबाबतचे व्हीजन मतदारांपुढे मांडले आहे.

अ‍ॅड. खंडुजी तिकोणे यांच्या वचननाम्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –
– मावळ विधानसभा मतदारसंघात असलेली नैसर्गिक साधन सामग्री व ऐतिहासीक पार्श्वभूमी
व साधुसंताच्या वारसा यांचे जतन करून पर्यटन केंद्र विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणार.
– कृषी पर्यटन विकसित करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार.
– वाढणारी कारखानदारी व तिचा ओघ वाढवून पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार
– मावळात वाढलेली दशहत व बळाचा वापर या विरुध्द शासकिय पातळीवर आवाज उठवणार
– जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व एस.टी.बस च्या पासमध्ये सवलत मिळवून देणार.
– मावळ विधानसभा मतदारसंघाचे धार्मिक व ऐतिहासीक महत्व लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी
विशेष प्रयत्न करणार त्यासाठी प्रभावी मार्केटिंग यंत्रणा उभारणार.
– मावळ विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक उभारुन पर्यटकांची सोय करणार.
– लोणावळा शहरात अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारुन गरीब जनतेला माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार.
– देहूरोडमधील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून देहूरोडकर नागरीकांची मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार.
– तळेगाव शहरामधील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार.
– तीर्थक्षेत्र देहू ‘स्वच्छ देहू, सुंदर देहू’ होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
– देहू शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
– कामशेत शहरामध्ये खाजगी वाहतूक व्यवसायिकांना वाहतूक थांबा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार
– नदीकाठच्या गावांना नदीवर पूल उभारून जोडणी करणार
– वडगाव येथे शासकीय कामांनिमत्त नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
– तालुक्‍यातील धरण प्रकल्पग्रस्तांना सर्वोतोपरी मदत होण्यासाठी प्रयत्न करणार.
– मावळ विधानसभा मतदारसंघातील पाणी वितरण व्यवस्था बळकट करुन नागरिकांना स्वच्छ व पुरेशे पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार
– शेतकऱ्यांना विविध भागात आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून शेती माल
विक्रीसाठी सहाय्य करणार तसेच नागरिकांना स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
– तळेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केले त्याठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार.
– मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी विधीमंडळ कामकाजातील आयुधांचा सक्षमपणे वापर करुन निधी कसा आणला जातो, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देणार.
– महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार
– आयटी हबच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.