BNR-HDR-TOP-Mobile

Maval : मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार; पार्थ पवार यांचा विश्वास

साहेब, दादा आणि सुप्रिया ताईंच्या आशीर्वादाने यशस्वी होईल

861
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – माझ्या सहका-यांच्या पाठिंब्याने व आशीर्वादाने मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला आहे. साहेब, दादा आणि सुप्रिया ताईंच्य नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य मला मिळत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनाच्या वाटचालीत मी यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.

मावळ मतदार संघातून पार्थ यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार म्हणतात, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात करीत आहे. आशाताई पवार आणि अनंतराव पवार यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. साहेबांच्या, दादांच्या आणि सुप्रिया ताईंच्य नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य मला मिळत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनाच्या वाटचालीत मी यशस्वी होईन. आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता मला माझ्या कामासाठी आणखी उर्जा मिळत आहे.

माझ्या सहका-यांच्या पाठिंब्याने व आशीर्वादाने मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार, यावर माझा विश्वास आहे. मावळचा दूरगामी विचार आणि शाश्वत विकास करणे, तिथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देणे, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणे हे विषय माझ्यासाठी प्राधान्याचे राहतील. माझ्या देश बांधवाच्या समस्यांकडे लक्ष देऊन संसदेत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्की सार्थ ठरवेन.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3