Maval : मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी उमेदवारांची आकुर्डीत बैठक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची येत्या सोमवारी (दि.13) बैठक आयोजित केली आहे. 23 मे रोजी होणा-या मतमोजणी प्रक्रियेची उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे.

आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 23 मे रोजी मतपेट्या उघडल्या जाणार असून निवडणूक विभागाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

मतमोजणी प्रक्रियेची माहिती, मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी नेमणुकीची कार्यपद्धती, सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे. मतमोजणीदिवशी स्ट्राँग रुम’कधी उघडली जाणार आहे. मतमोजणीचे राऊंड कसे असणार आहेत. एका टेबलवर किती माणसे बसू शकतात. एकमेकांचे पासेस वापरल्यास कारवाई होऊ शकते याची माहिती आणि जाणीव या बैठकीत करुन दिली जाणार असल्याचे कविता द्विवेदी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.