BNR-HDR-TOP-Mobile

Maval : राज्यमंत्री संजय भेगडे यांचा रविवारी मावळात स्वागत व आभार दौरा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्य़क्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन हे खाते दिल्यानंतर मावळवासियांकडून स्वागत दौरा आयोजित केला आहे.

रविवारी (दि. 23 जून) सकाळी साडे सात वाजता खंडाळा येथील वाघजाई मंदिर, अभिषेक व दर्शन, साडे आठ वाजता लोणावळा येथील संचेती लॉन्स , सकाळी नऊ वाजता लोणावळा शहरात जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

  • तसेच त्याचदिवशी साडे दहा वाजता कार्ला फाटा येथे स्वागत, दुपारी दीड वाजता वडगाव मिरवणुक व स्वागत, दुपारी अडीच वाजता जेवण, दुपारी साडे तीन वाजता सोमाटणे फाटा, देहुरोड शहर, चिंचोली, माळीनगर सायंकाळी साडेपाच वाजता देहुगाव येथे स्वागत व तुकाराम महाराज दर्शन, सायंकाळी सव्वा सहा वाजता इंदोरी, संध्याकाळी पावणेसात माळवाडी, सायंकाळी सात वाजता तळेगाव स्टेशन, सायंकाळी साडेसात वाजता तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिराजवळ मिरवणुकीचे आभार दौ-याचा समारोप होईल.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3