Maval : आमदार बाळा भेगडे यांनी विकासकामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे विविध प्रलंबित असलेल्या विकासकामांचा आढावा आज झालेल्या बैठकीत आमदार बाळा भेगडे यांनी घेतला. या बैठकीत जी विकासकामे प्रलंबित ती विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना अधिका-यांना आमदार बाळा भेगडे यांनी आज दिल्या.

पंचायत समिती, वडगाव मावळ येथे आमदार बाळा भेगडे यांनी आढावा बैठक घेतली. उपसभापती जिजाबाई पोटफोडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, गुलाब म्हाळसकर, शांताराम कदम, गणेश धानिवले, सरचिटणीस बाबूलाल गराडे, तुंग ग्रामपंचायत सरपंच वसंत म्हसकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण राक्षे, शंकर देशमुख, शिरदे ग्रामपंचायत सरपंच नामदेव बगाड, लोहगड ग्रामपंचायत सरपंच नागेश मरगळे, माऊली गुंड, तसेच गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, एम.एस.सी.बी.चे अधिकारी, रूरबनचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती मावळ, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II
  • या बैठकीमध्ये मावळ तालुक्यामधील प्रलंबित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अनुयती योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तसेच रूरबन विकास योजनेमधील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

मावळ तालुक्यातील मंजूर कामांची निविदास्तरावरील प्रकिया तात्काळ पूर्ण करून सबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.