Maval : आमदार बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यात घेतली सलग 11 तास बैठक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सत्तर गावांच्या विविध समस्यांबाबत पंचायत समिती, वडगाव मावळ येथे आमदार बाळा भेगडे यांनी ग्रामपंचायत निहाय विकासकामांच्या आढाव्या संदर्भात सलग अकरा तास बैठक घेतली. मावळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 11 तास बैठक घेवून 55 ग्रामपंचायतीचा (70 गावांचा) आढावा आमदार बाळा भेगडे यांनी घेतला.

तालुक्यातील 6 गणांचा समावेश होता व गणा अंतर्गत येणाऱ्या 70 गावातील प्रलंबित व झालेल्या विकास संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, जलसंधारण, नळपाणी पुरवठा, साकव पूल, विद्युत समस्या, गावतळे सुशोभीकरण, जलयुक्त शिवार योजनेतील कामे, जि.प.शाळा दुरुस्ती व बांधकाम, आरोग्य विषयक समस्या, व्यायामशाळा व साहित्य व इतर समस्यांचा समावेश होता.

  • या बैठकीस सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती शांतारामबापू कदम, जिल्हा परिषद नितीन मराठे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्या निकिता घोट्कुले, ज्योती शिंदे, मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, भा.ज.पा.यु.मो.अध्यक्ष बाळासाहेब घोट्कुले, माजी सभापती राजाराम शिंदे, सहकार आघाडी अध्यक्ष आबा पवार, संजय गांधी योजना अध्यक्ष किरण राक्षे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्ता केदारी, संतोष कुंभार, नितीन घोट्कुले, गणेश ठाकर, अमोल भेगडे इत्यादी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सोनवणे साहेब, जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता क्षीरसागर साहेब, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी इत्यादी सर्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

निमंत्रित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक व गावातील प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीस 10 ते 15 मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला होता. या बैठकीस सर्व विभागाचे अधिकरी उपस्थित असल्यामुळे काही समस्यांचे जागेवरच निरसन करण्यात आले व काही मागण्याचे/समस्यांचे प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.

  • ग्रामपंचायतीकडून दिलेले प्रस्ताव तातडीने मार्गस्थ करण्याचे आश्वासन आमदार बाळा भेगडे यांनी यावेळी दिले. तसेच उर्वरित 4 गणांच्या आढावा बैठकी येणा-या 8 दिवसात घेण्यात येतील, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.