Maval : आमदार सुनील शेळके यांनी जाणून घेतल्या डोंगरवाडी गावच्या समस्या

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वडगाव जवळील डोंगरवाडी (उर्से) गावच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी या गावाचा पाहणी दौरा केला. या वेळी गावातील विविध प्रश्नांवर गावकऱ्यांशी चर्चा करून या समस्या जाणून घेतल्या.

मोजकी घरे आणि डोंगरपठारावर वसलेले डोंगरगाव लोकप्रतिनिधीच्या भेटीपासून नेहमी वंचित असते. 25 वर्षांपूर्वी या गावाला माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या प्रयत्नातून वीज उपलब्ध करून देण्यात आली होती. दुर्गम भागात असलेल्या या गावाची पाहणी गुरुवारी (दि. १३) मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. आमदार सुनील शेळके यांच्यासमोर गावकऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. गावातील इतर गैरसोयी आणि साधन सुविधांची माहिती यावेळी घेण्यात आली.

मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या या गावाला मदत करून त्यांच्या समस्यां सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी सुनील शेळके यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.