Maval: कोरोनाच्या लढाईसाठी यंत्रसामग्रीकरिता सुनील शेळके यांनी दिला आमदार निधी

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विरोधातील लढाई तुटपुंज्या वैद्यकीय साहित्याच्या बळावर जिंकता येणार नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव  प्रतिबंधक व प्रसार नियंत्रणाकरिता उपाययोजना करण्यासाठी यंत्रसामग्री, सुविधांसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आमदार निधी उपलब्ध करुन दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना केली होती.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सक्षम केल्या जात आहेत. कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढल्यास रुग्णांची संख्या वाढणार आहे.  या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची व्यवस्था प्रशासकीय स्तरावर करणे चालू आहे. त्याचप्रमाणे अशा संभाव्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची गरज भासणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवण्याच्या हेतूने विविध वैद्यकीय साहित्य ठेवणे आवश्यक आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील दोन ग्रामीण रुग्णालय, सहा प्राथिमक आरोग्य केंद्र, तीन नगरपालिका क्षेत्र तसेच आपत्कालीन परिस्थितीत तीन नवीन आणि तीन तात्पुरती रुग्णालये यांचा विचार करता वैद्यकीय साहित्य सज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी 1500 एन 95 मास्क,  एक हजार पीपीई किट, दोन हजार हॅण्ड सॅनिटायझर, तीन हजार नॉन स्ट्रेलाईझ ग्लोज, 400 सोडियम हायप्लो क्लोराईड, चार हजार ट्रीपल लेअर मास्क, 12 नॉन कॉनटॅक्ट स्कॅनर, दोन, व्हेंटिलेटर, तीन हजार कोवीड तपासणी कीट आणि 44 पेशंट बेड मॅटसह हे सर्व साहित्य आपल्या आमदार निधीतून खरेदी करण्याची सूचना आमदार शेळके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.