Maval: आमदार सुनील शेळके यांच्यातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र, मोफत वाहतूक सेवा’ उपक्रम

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर होवू नये. विद्यार्थ्यांना वेळेत पोहचता यावे यासाठी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून माय मावळ फाउंडेशनच्या वतीने यंदा देखील तालुक्यातील विविध भागामध्ये ‘घर ते परीक्षा केंद्र, मोफत वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे  अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत असून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा मंगळवार (दि.3) पासून सुरु झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील 12 परीक्षा केंद्रावर 6647 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे अत्यावश्यक असते. ही गरज ओळखून मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून माय मावळ फाउंडेशनच्या वतीने सन 2016-17  पासून मावळ तालुक्यातील विविध भागामध्ये ‘ घर ते परीक्षा केंद्र मोफत वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली आहे. यंदा देखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ भागातील तळेगाव दाभाडे, वराळे, इंदोरी, लोणावळा, पवनानगर, चावसर, तुंग, कामशेत, उकसाण, वडगाव, चांदखेड, नायगाव, सावळा, खांडी, कान्हे, कार्ला, शिवणे, थोरण, जांबवली, कांब्रे, चिखलसे, निगडे, भोयरे आदी गावांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्या व येण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील 12 परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी ही सेवा करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात अभ्यास, परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे आणि घरी जाणे या चिंतेमुळे विद्यार्थ्यांची धावपळ होते. त्यातच वेळेवर परीक्षा केंद्रावर न पोहचल्याने वर्षभर अभ्यास करून परीक्षा न देता आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दहावी नंतर करिअरची संधी असते. परीक्षेचे दडपण घेऊन मनात भीती बाळगून विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यातच मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याने मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे या उद्देशाने आमदार शेळके यांनी तालुक्यातील विविध  भागामध्ये ‘घर ते परीक्षा केंद्र मोफत वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आमदार सुनील शेळके यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.