.

Vadgaon Maval : पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी मावळचे आमदार सुनील शेळके यांची निवड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता थेट निवडणुकीद्वारे निवडून देण्याच्या तीस सदस्यांच्या निवडणुकीस विलंब लागत असल्याने शासनाने नामनिर्देशित आणि खासदार,आमदार यांच्या मधून नियुक्त करावयाच्या सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये आमदार शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेळके यांच्या निवडीमुळे मावळ तालुक्यात विशेषतः राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पुणे महानगर नियोजन समितीचे आगामी पाचवर्षांसाठी गठण करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

पुणे महानगर नियोजन समितीमध्ये संपूर्ण  मावळ तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या समितीवर आमदार शेळके यांची निवड झाल्याने राष्ट्रवादीत आनंदाचे वातावरण आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn