Maval MNS : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मनसे पूर्ण ताकतीने लढणार

एमपीसी न्युज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका कोर कमिटी व मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या उपस्थितीत नाणे मावळ विभाग नूतन कार्यकारणी जाहीर करणे तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शिलाटणे येथे पार पडली. (Maval MNS) या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मनसे पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे ठरले.

 

यावेळी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या पदनिवडीबाबत तसेच पक्ष संघटनवाढी व पुनर्बांधणी संदर्भात महाराष्ट्र सैनिकांशी चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतिशी लढवणार असून सर्व इच्छुकांनी कामाला लागावे अशा सूचना यावेळी कोर कमिटीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

Today’s Horoscope 5 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याप्रसंगी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,मनसे रस्ते आस्थापना व साधन सुविधा पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर,कोर कमिटी सदस्य सुरेश जाधव,संजय शिंदे,तानाजी तोडकर, (Maval MNS) अनिल वरघडे,योगेश हुलावळे,संतोष खराडे,अनंता तिकोने,सुनील साळवे, महेंद्र शिंदे,नाथा पिंपळे तसेच बहुसंख्येने मनसैनिक उपस्थित होते.  बैठकीचे आयोजन संग्राम भानुसघरे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.