Maval: खासदार श्रीरंग बारणे यांची मोलाची मदत; गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Maval: MP Shrirang Barne's valuable help; Distribution of essentials kits to the needy

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या अतिशय गरजू, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट पोहचविल्या आहेत. मागील महिन्याभरापासून किटचे वाटप केले जात आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत गरीब कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. भयावह परिस्थितीमध्ये मदतीचा हात पुढे करत मावळ लोकसभा मतदार संघातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूची किटचे वाटप केले जात आहे. दोन महिन्यांपासून हजारो कामगार, मजूर, सामान्य कुटुंब घरामध्ये बसून आहेत.

मावळ मतदारसंघातील ख-या अर्थाने जे गरजू आहेत. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत केली जात आहे. पिंपरी-चिंचवड, मावळसह घाटाखालील भागातील गरजू नागरिकांना किटचे वाटप केले. आदिवासी पाड्यावर अन्नधान्याच्या किट पोहचविल्या आहेत. गहू, तांदूळ, साखर, डाळ, तेल, मसाला किटमध्ये दिला आहे.

मागील महिन्याभरापासून वाटपाचे काम सुरु आहे. पाच हजार लोकांना आत्तापर्यंत किटचे वाटप केले आहे. मावळ मतदारसंघातील ज्यांना ख-या अर्थाने मदतीची गरज आहे, अशा कुटुंबाना मदत केली जात आहे. त्याची कोणतीही प्रसिद्धी न करता खासदार बारणे यांनी गरजूंपर्यंत मदत पोहचविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.