Maval Mucormycosis Patients News :  तालुक्यातील पहिला म्युकरमायकोसिस रुग्ण बरा 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पहिला म्युकरमायकोसिस रुग्ण बरा झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व आस्था हॉस्पिटलचे डॉ. अमित मोरे यांनी रविवारी (दि. 30) दिली.

देवेंद्र तानाजी कोळेकर (वय 29, रा. राजापूर जि सांगली) असे बरे झालेल्या रुग्णाचे नाव आहे. देवेंद्र कोळेकर यांना (दि.27 एप्रिल) ला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सांगली येथील शारदा कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु होते. त्यांना (दि. 12 मे) उजव्या डोळ्याने अंधुक दिसायला लागल्याने (दि. 15 मे) एमआरआय केला. त्यावेळी म्युकरमायकोसिस झाल्याचे सिद्ध झाले.

देवेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील कान, नाक व घसा तसेच डोळ्याच्या तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. सांगली येथे कोणत्याही हॉस्पिटलने आजाराच्या उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

औषध वितरक महादेव पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी (दि. 16 मे) ला तळेगाव दाभाडे येथील आस्था हॉस्पिटलचे डॉ. अमित मोरे यांना रुग्णाची माहिती दिली. त्यानुसार डॉ. मोरे यांनी रुग्णांना त्वरित घेऊन येण्याचे सांगितले.

(दि. 17 मे) ला औषधोपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले. तेव्हा उजव्या डोळ्याने त्यांना काहीच दिसत नव्हते तर डाव्या डोळ्याने बरच अंधुक दिसत होते.

रुग्ण कोळेकर यांच्यावर येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये डॉ. अमित मोरे यांनी शस्त्रक्रिया करून म्युकरमायकोसिसचे फंगस (बुरशी) काढण्यात आले. त्यांच्या दोन्ही डोळ्यापैकी डावा डोळा वाचवण्यात आला. अँटी फंगल इंजेक्शन सुरु केले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली.

“रुग्ण देवेंद्र कोळेकर म्हणाले कोरोना व म्युकरमायकोसिस झाल्याने मला सांगली येथे औषधोपचार मिळाले नाहीत. मला अंधत्व येण्यापासून वाचवण्यात डॉ. अमित मोरे यांचे मोलाचे प्रयत्न लाभले.

वेळेत उपचार घेतले तर डोळे व मेंदू वाचवू शकतो. मला डॉक्टरांमध्ये देव दिसला.”

डॉ. अमित मोरे म्हणाले म्युकरमायकोसिस आजार जीव घेणारा असुन प्रत्येक कोविड रुग्णांनी जवळच्या कान, नाक व घसा तज्ज्ञांना दाखवून काही प्राथमिक लक्षणे असल्याचे जाणून घ्यावे. यामुळे या आजारापासून आपली सुटका होईल. ज्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे अशा रुग्णांनी घाबरून न जाता त्वरित औषधोपचार सुरु करावे. सरकारने अँटी फंगल इंजेक्शन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्वरित उपलब्ध करुन द्यावेत. या रुग्णाच्या औषधोपचारासाठी

समर्थ हॉस्पिटलचे डॉ. सुदाम खेडकर व डॉ. संतोष जमदाडे यांचे विशेष सहकार्य मिळाले.

“तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे म्हणाले कोरोनाच्या रुग्णांना म्युकरमायकोसिस लक्षणे जाणवत असल्यास त्वरित कान, नाक व घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रुग्णांनी घाबरून न जाता वेळेत औषधोपचार घेतल्यास या आजारावर मात करु शकतो. या आजाराचा मावळ तालुक्यातील प्रथम रुग्ण बरा करण्यास यश आले आहे. अँटी फंगल इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये त्वरित उपलब्ध करुन देण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.