Maval Murder Update: यश असवले खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

Maval Murder Update: Two more arrested in Yash Aswale murder case, number of accused rises to 10

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील यश असवले खूनप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या दहावर गेली आहे.

शाहरूख जलील शेख (वय 24 रा वराळे) व आकाश एकनाथ नवघणे (वय 28, रा. टेल्को काॅलनी, वडगाव मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शुक्रवारी (दि 22) रोजी रात्री दहाच्या सुमारास यश रोहिदास असवले या तरूणाचा खून करून सर्वजण फरार झाले होते. पोलिसांनी सापळा रचून पाच तासात मोठ्या शिताफीने सात जणांना अटक केली. त्यापाठोपाठ रविवारी (दि 24) रोजी विद्यमान उपसरपंच रोहिदास असवले याला अटक केली.

तपासाअंती शाहरूख जलील शेख व आकाश एकनाथ नवघणे या दोघांची नावे निष्पन्न झाल्याने मंगळवारी (दि 26) रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक फौजदार विश्वास आंबेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.