Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब नवले तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब भेगडे

एमपीसी न्यूज- संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. आज, बुधवारी नूतन संचालकांची पहिलीच विशेष सभा बोलावण्यात आली होती. या बैठकीत माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले यांची अध्यक्षपदी म्हणून तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली. 

मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आर बी दोंडकर व सहाय्यक निबंधक अरूण साकोरे यांनी काम पाहिले. यावेळी निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आत्माराम कलाटे, माजी आमदार दिगंबर भेगडे आदींसह सर्व नवनिर्वाचित संचालक व मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष नानासाहेब नवले व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2
You might also like