Maval : कांब्रे-कोंडिवडेमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कांब्रे- कोंडीवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत 87 लाख 89 हजार रुपये खर्चाच्या विकासकामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

14 वित्त आयोग निधीमधून दोन लक्ष रूपये अंतर्गत गटर बांधण्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. तसेच पुणे जिल्हा परिषद कृषी संवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या फंडातून स्मशान भूमी निवारा शेडच्या सुमारे तीन लाख रुपये खर्चाच्या कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला तसेच स्मशानभूमीत ‘शवदाहिनी’ बसविण्यात आली.

या सर्व कामांचे उद्घाटन कांब्रे- कोंडीवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच तृप्ती तथा करूणा कैलास गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड, नथू गायकवाड, भाऊसाहेब दाभणे, माजी उपसरपंच सावित्रा दाभणे, नाथा गायकवाड, विजय गायकवाड, रोहिदास गायकवाड, अनिल गायकवाड, नितीन गायकवाड, गोपाळ गायकवाड, तुकाराम गायकवाड, मारुती गायकवाड, गणपत गायकवाड, नितीन गायखे, नामदेव गायकवाड, निवृत्ती रणदिवे गुरुजी, लक्ष्मण कांबळे गुरुजी, नंदू गायकवाड, सुरेश भांगरे व ग्रामसेवक जे. एस. तांबे तसेच कांबळे, लवटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.