Maval Ncp News : ‘ईडी’मुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले- सुप्रिया सुळे

आमदार सुनील शेळकेंच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारकडून पाठविलेल्या ईडीच्या नोटीसीचे व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले ; ईडीचा पायगुण लय भारी !. ईडीमुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले. आता शिवसेनेला ईडीची नोटीस आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, अशी शंका घेतली जात असताना आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

मावळचे आमदार सुनील शेळके हे नवोदित आमदार असून देखील त्यांची कोणत्याही मतदार संघातील लोकांसाठी काम करण्याची पद्धत कौतुकास्पद असल्याचा विशेष उल्लेखही खासदार सुळे यांनी यावेळी आवर्जून केला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त शनिवार (दि.२८) रोजी तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेश खांडभोर, एसआरपी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, तालुका ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे,  राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जीवन गायकवाड, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, अल्पसंख्याक महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शबनम खान, शिवसेनेच्या शादान चौधरी, शिवसेना तालुका समन्वयक रमेश जाधव, राष्ट्रवादीचे देहूरोड शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू,  उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, नगरसेविका मंगल भेगडे, संगिता शेळके, मावळ तालुका युवती अध्यक्षा निशा पवार, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, सरपंच दत्तात्रय पडवळ, काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष विलास मालपोटे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, शीतल हगवणे, ज्योती शिंदे व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, की आपले उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारे आणि स्वच्छ प्रतिमा असलेले आहेत. त्यामुळे एक चांगले नेतृत्व देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.

मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, भाजपने मावळ तालुक्यातून घड्याळ व पवार मुक्त करण्याची स्वार्थी घोषणा केली. आता भाजपला पाहायला व ऐकायला नागरिकांसाठी वेळ नाही. १० वर्षात चंद्रकांतदादा पाटील मतदान कसे करावे हेच फक्त शिकवत राहिले. पदवीधरांचे प्रश्न आणि समस्या कधीच विधानपरिषदेत मांडल्या नाहीत. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी आपले उमेदवार सक्षम आहेत.

शेळके पुढे म्हणाले, तळेगाव-चाकण- शिक्रापूर मार्गासाठी ३०० कोटी व लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी ६४ कोटी मंजूर केले आहेत.  महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून व महाविकास आघाडीच्या उमेदवारास मावळातून सर्वाधिक मते देण्यासाठी सक्रीय होण्याचे आवाहन शेळके यांनी केले.

यावेळी आमदार संजय जगताप, प्रदीप गारटकर, राजेश खांडभोर, यादवेंद्र खळदे आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.

सूत्रसंचालन चंद्रजित वाघमारे व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले. आभार नगसेवक गणेश काकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like