Maval: जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची चिंचवडमध्ये पदयात्रा 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी)जय पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. चिंचवड परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. 

मावळ, शिरुर लोकसभा मतदासंघातील प्रचाराचा धुराळा आज (शनिवारी)सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. शेवटच्या दिवशी रॅली काढून उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ त्यांच्या बंधू जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जय पवार, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विजय गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.