Maval NCP : मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर कदम

एमपीसी न्यूज – मावळ तालुका (Maval NCP) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर सुदामराव कदम यांची निवड करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते समीर कदम यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (Maval NCP) युवक अध्यक्ष किशोर भाऊ सातकर,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष साहेबराव कारके, मावळ राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, चंद्रकांत घोलप, रवी वायकर, विशाल पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.