Maval : राष्ट्रवादी काँग्रेसनेही फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

एमपीसी न्यूज – भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार सुंदोपसुंदी सुरू असून त्यातून तालुक्यात तीन स्वतंत्र दौरे निघालेल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतेक सर्वच इच्छुकांनी एकत्र येत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीशिर्डी शिरगाव येथे साईबाबांचे आशीर्वाद घेऊन जनसंपर्क दौऱ्यास सुरूवात करीत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

केवळ गटातटाच्या राजकारणामुळे मावळ तालुक्यात गेली २५ वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन चूक सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपला गटबाजीचे ग्रहण लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता परिवर्तनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.

ढोल-ताशांचा दणदणाट फटाक्यांचा धुमधडाका, जीप, बैलगाडी यावरून बापूसाहेबांची मिरवणूक गावोगावी होणारे औक्षण, गावातील मंदिरात बापूसाहेबांचे मार्गदर्शन ऐकायला गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांचा सहभाग यामुळे लक्षणीय गर्दी होती.

सोमवारी (दि. 16) प्रतीशिर्डी शिरगांव येथून साईबाबांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन गोडूंब्रे, साळुंब्रे,सांगावडे, दारूंब्रे, कुसगाव, पाचाणे, चांदखेड, आढले खुर्द, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, आढले ब्रु.,बेबडओव्हळ, परंदवडी, सोमाटणे आदी गावांना भेटी देत जनसंपर्क केला.

मंगळवारी (दि 17) शिवणे, मळवंडी ढोरे, थुगांव आर्डव, येलघोल, धनगव्हाण, शिवली, भडवली, कडधे, बेडसे, करूंज, बऊर, सडवली, ओझर्डे, आढे, पिंपळखुंटे, धामणे, उर्से अशा दोन दिवसाच्या पवन मावळ पूर्व भागातील गावभेट दौ-याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवारी मावळ भागात झालेल्या जोरदार पावसात देखील या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगरसेवक किशोर भेगडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, ज्येष्ठ नेते महादूबुवा कालेकर, नगरसेवक संतोष भेगडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, तालुका युवक कार्याध्यक्ष सुनीलनाना भोंगाडे, ज्येष्ठ नेते वि.म.शिंदे गुरुजी, महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत,मनोज येवले, विशाल पवार, अरुण माने, किशोर कवडे, नवनाथ चोपडे, अतुल राऊत, आफताब सय्यद, विकी लोखंडे, राकेश घारे, तुषार भेगडे, सचिन भेगडे,विशाल वहिले, शरद कुटे, अविनाश गराडे, मनोज वाळुंज, प्रसाद काळोखे व पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष व पदाधिकारी या दौ-यात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.