Maval News : छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त साते येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज(श्याम मालपोटे)- छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास निमित्त रविवार दि.19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ( Maval News ) समस्त ग्रामस्थ मंडळी साते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मावळ आणि बजरंग दल मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने केले गेले.तब्बल 106 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

 

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवास सुरुवात

पिंपरी चिंचवड ब्लड बँक संस्थेमार्फत रक्तदान शिबीर पार पडले.दरम्यान साते येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यामध्ये तरुण व तरुणी एकत्र येत बलिदान मासाचे नियमांचे तंतोतंत पालन करत आयोजन करतात.

 

गावामध्ये बलिदान मास निम्मित मूक पद यात्रा देखील काढण्यात आली होती.धर्मकार्याची जाण असावी व धर्मनिष्ठा जागृत राहावी म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास चे पालन केले जाते. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपली जाते
रक्तदात्यांना ग्रामस्थांमार्फत छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा व शिवप्रेरणा स्रोत पुस्तिकाचे ( Maval News ) वाटप करण्यात आले. सर्व आरोग्य सेवकांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.