Maval News : वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत शिव वंदना ग्रुपचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज – वेळेवर मिटर रिडींग न घेणे, वेळेवर लाईट बिल न वाटणे यांसारख्या समस्यांबाबत शिव वंदना ग्रुपच्या वतीने महावितरणच्या वडगाव येथील कार्यालयात निवेदन दिले. महावितरणच्या ठेकेदारांच्या चुकांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी ग्रुपचे पदाधिकारी दिनेश ठोंबरे तुषार वहिले, अभिजित भेगडे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या कालावधीत ग्राहकांच्या घरच्या मीटरचे रिडिंग घेतले गेले नाही व लाईट बील देखील वाटप केले नाही.परंतु लाॅकडाऊन नंतर विज ग्राहकांना एकदम बिलाचा भार येऊन देखील तो सर्व ग्राहकांनी भरला.

गेल्या तीन चार महिन्यांपासून पुन्हा रिडींग घेतले जात नाही आणि बिलेही वेळेवर वाटप केली जात नसल्याने ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

वेळेवर बील व रिडींग झाले नाहीतर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी महावितरणचे अधिकारी अनिल मेहगल यांनी आठ दिवसात पुढील रीडिंग व लाईट बिल वेळेवर वाटण्याचे आश्वासन दिले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.