मंगळवार, जानेवारी 31, 2023

Maval News : भरधाव दुचाकी चालवणे 16 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले

एमपीसी न्यूज – कायद्यानुसार वाहन चालवण्याचा परवाना 18 वर्षा नंतर मिळतो पण अगदी 14-15 वर्षाची मुले देखील रस्त्यावर बिनधास्त गाडी चालवत असतात, पालकांना यात काही वावगं वाटत नाही पण ही हौस जीवावर बेतू शकते. भरधाव वेगात बुलेट दुचाकी चालवत जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा (Maval News) मृत्यू झाला. टेम्पोला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या कारला धडकून झालेल्या अपघातात हा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता मावळ तालुक्यातील सुदवडी गावात घडली.

Chinchwad Bye Election: पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले…

रविवारी दुपारी साडेतीन वाजता 16 वर्षीय मुलगा बुलेट (एमएच 14/जीई 1832 ) वरून भरधाव वेगात चाकण-तळेगाव रोडने जात होता. त्याने टेम्पोला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका कारला त्याची धडक बसली. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत (Maval News) आहेत.

 

Latest news
Related news